pm vishwakarma yojana|प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजने द्वारे असंघटित कामगारांना मिळणार मोफत १५००० रुपये व व्यवसायासाठी १ लाख ते २ लाख कर्ज कमी व्याज दरात .
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालू केली आहे .ही योजना सरकारने असंघटित कामगारांसाठी आहे.या योजने द्वारे असंघटित कामगारांना आता त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे .या योजने द्वारे लाभार्थीला एक प्रमाणपत्र व आयकार्ड मिळते त्याला विश्वकर्मा म्हणून ओळखले जाते ज्या द्वारे लाभार्थीला नोकरीच्या ठिकाणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रमाणपत्र दाखवून लाभ मिळू शकतो या योजने द्वारे लाभार्थिला त्याच्या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी १५००० रुपये दिले जातात तसेच त्याला त्याचा व्यवसाय वाढीसाठी १ लाख रुपये ते २ लाख रुपये तेही कमी व्याज दरात दिले जाते.
pm Vishwakarma yojana या योजने विषयी आपण खालील माहिती पाहणार आहोत
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची उद्दिष्ट
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची पात्रता
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी कोण कोण पात्र आहेत ?
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना फॉर्म कुठे भरायचा / कसा भरायचा
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची फॉर्म भरण्यासाठी लास्ट तारीख
या गोष्टी आपण व्यवस्थित पाहणार आहोत
pm Vishwakarma yojana 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची उद्दिष्ट
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे असंघटित कामगारांना त्यांच्या व्यवसायात चालना मिळावी.त्यांचा परंपरागत पद्धतीने चालत आलेला व्यवसाय तसाच पुढे चालू रहावा.त्यांची कला विलुप्त होऊ नये हाच मुख्य उद्दिष्ट आहे या योजने द्वारे त्यांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी १५००० रुपये सरकार देत आहे जेणेकरून त्यांना त्यांचे काम करत असताना साहित्य नसल्यामुळे अडचण येऊ नये तसेच व्यवसास वाढीसाठी त्यांना १ लाख रुपये ८ महिन्याच्या कालावधीसाठी ५% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देते ते व्यवस्थित भरले तर त्यांना अजून २ लाख रुपये 30 महिन्याच्या कालावधीसाठी ५% व्याज दराने कर्ज सरकार देते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची पात्रता
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी खालील प्रमाणे पात्रता दिलेली आहे
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी फक्त असंघटित कामगारांचा समावेश होतो.
- स्वतः रोजगाराच्या हातावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि योजनेत नमूद केलेल्या परंपरागत व्यवसाय पैकी एक कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी पात्र असेल.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरताना लाभार्थीचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असावे.
- लाभार्थी नोंदणी तारखेला त्याच्या व्यवसायात गुंतलेला असावा.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने मागील ५ वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा उदाहरणार्थ ( PMEGP, PM Sva Nidhi, Mudra )
- योजनेचा लाभ हा एकत्र कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येईल.
- या योजने साठी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी मध्ये असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे
- या योजने अंतर्गत तुम्हाला प्रमाणपत्र व ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून ओळखले जाईल
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने द्वारे तुम्हाला मोफत १५००० रुपये अनुदान भेटेल.जेणे करून तुमचा पारंपारिक चालत आलेल्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी दिले जातील
- या योजने अंतर्गत लाभार्थीला ५ दिवसाचे म्हणजेच ४० तासाचे प्रशिक्षण दिले जाईल .या प्रशिक्षण कालावधीत लाभार्थीला प्रत्येक दिवसाला ५०० रुपये मानधन दिले जाईल.
- जर लाभार्थी अजून प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असेल तर तो १५ दिवसाचे म्हणजेच १२० तास मूलभूत प्रशिक्षण घेऊ शकतो या दिवसात सुध्दा लाभार्थीला ५०० रुपये मानधन दिले जाईल.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थीला प्रशिक्षण झाल्यावर पहिला हफ्ता १ लाख व दुसरा हफ्ता २ लाख रुपये सरकार कर्ज स्वरूपात देते त्याची परतफेड लाभार्थीला १ लाख कर्जासाठी ८ महिन्याची मुदतवाढ व २ लाख कर्जासाठी ३० महिन्याची मुदतवाढ दिली जाते.सरकारने या कर्जासाठी व्याजदर हा ५% दराने ठेवला आहे.
- क्रेडिट गॅरंटी फी भारत सरकार द्वारे वहन केली जाईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी कोण कोण पात्र आहेत ?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी सरकारने काही ठराविक असंघटित कामगारांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे .कोण कोणते कामगार या योजने साठी पात्र आहेत ते पुढील प्रमाणे,
- लाकूड आधारित – सुतार , बोट मेकर
- लोह धातुवर आधारित / दगडावर आधारित – आर्मरर , लोहार , हॅमर आणि टूल किट मेकर , लॉक स्मिथ , शिल्पकार ( मूर्तिकार/दगड कोरणारा )
- सोने / चांदी वर आधारित – सुवर्णकार ( सोनार )
- कले आधारित – कुंभार
- लेदर बेल्ट / मोची – चपला पादत्राणे कारागीर
- आर्किटेक्चर / बांधकाम – मेसर ( गवंडी )
- इतर – बास्केट / चटई / झाडू बनवणारा / कॉयर / विणकर / बाहुली आणि खेळणी बनवणारा ( पारंपारिक ) / शिंपी ( दरजी ) / मासे पकडण्याची जाळी बनवणारा
pm Vishwakarma yojana online apply / प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना फॉर्म कुटे भरायचा
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही आपण जवळच्या माही सेवा केंद्र म्हणजेच CSC center येथे जाऊन भरू शकता किंव्हा तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल द्वारे रजिस्ट्रेशन करून भरू शकता .तो कसा व्यवस्थित भरायचा हे आपण पुढे पाहणार आहोत.
pm Vishwakarma yojana officially website येथे क्लिक करा
pm Vishwakarma yojana registration
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वरील वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर Login या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वतः भरायचा असेल तर Applicant/Beneficiary login यावर क्लिक करायचे Apply केल्यानंतर प्रथम तुम्हाला विचारेल की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला आहे काय Yes / No यातील No ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.पुढे तुम्हाला विचारेल तुम्ही ५ वर्षामध्ये loan घेतलेले आहे काय Yes / No यातील No ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर Continue करायचे आहे ते केल्यानंतर पुढील प्रमाणे page येतील
- Adhar Verification – यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डशी जोडलेला आहे .यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.ते टाकल्यावर तुम्हाला OTP तुमचा मोबाईल नंबर वर येईल तो टाकायचा आहे व continue करायचे आहे.
- Personal information – यामध्ये तुम्हाला तुमचे नाव / वडील ,पतीचे नाव / Birth date / martial status / Gender / category / Divyangjan (अपंग) / अपंग type . तुमचे काम महाराष्ट्रात आहे काय Yes / No . ज्या जिल्ह्यात राहता तिथेच व्यवसाय करताय का Yes / No
- Contact Details – mobile number / adhar Card number हे automatic येईल तुम्हाला pan card number टाकायचा आहे
- Family Details – ration card number टाकायचा आहे. Add Row- घरातील व्यक्ती यांची माहिती add करायची आहे ( त्यांचे नाव/आधारकार्ड नंबर/रिलेशन )
- Current Address – तुम्ही ग्राम पंचायत मध्ये येता का Yes / No . Yes केले तर तुम्हाला Block मध्ये ग्रामपंचायत चे नाव लिहायचे आहे
- Profession / Trade Details – तुम्ही कोणत्या कामगारांमध्ये मोडता म्हणजेच तुमचा कोणता व्यवसाय आहे – आर्मर / शिलाई / बास्केट मेकर / सुतार / मोची ( चपला / पादत्राणे बनवणारा ) / खेळणी आणि बाहुली मेकर ( पारंपारिक ) / मासेमारी नेट निर्माता / गोल्डस्मिथ / हॅमर आणि टूलकिट मेकर / लॉकस्मिथ / मलाकर / गवंडी / कुंभार / शिल्पकार ( मूर्तिकार ) दगड फोडणारे / शिंपी / वाशरमन . या पैकी जो तुमचा व्यवसाय आहे तो निवडायचा आहे.
- Business Address – यामध्ये १) same Address २) same current Address ३) Other यापैकी जो तुमचा व्यवसायाचा पत्ता आहे तो option सिलेक्ट करायचा आहे आणि Save वर क्लिक करायचे आहे.
- Credit Support Information – Saving Bank Details या मध्ये तुम्हाला तुमचे ज्या बँकेमध्ये अकाऊंट आहे त्या बँकेचे नाव टाकायचे आहे नंतर त्या बँकेचा IFSC CODE टाकायचा आहे, ज्या बँकेमध्ये अकाऊंट आहे त्या बँकेची शाखा कोणती आहे ते टाकायचे आहे . त्या बँकेचा अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे पुन्हा कन्फर्म बँक अकाऊंट नंबर टाकायचा आहे . पुढे तुम्हाला व्यवसायासाठी लोन पाहिजे असेल नसेल तर Yes / No ऑप्शन निवडावा Yes option क्लिक केला तर तुम्हाला १ लाख ते २ लाख रुपये ५ % व्याज दराने उपलब्ध होते . Yes क्लिक केले तर ते लोन तुम्हाला कोणत्या कारणासाठी हवे आहे ते पर्याय येतात Loan purpose ( purchase of equipment , working capital , business expansion ) हे पर्याय निवडावे लागतात . Loan outstanding – तुमचे लोन आहे का / असेल तर कसले आहे / त्याचा हफ्ता किती आहे हे सर्व भरावे लागते .
- Digital Incentive Details – तुम्ही ऑनलाईन पेमेंट घेता का . घेत असेल तर Yes या ऑप्शन वर क्लिक करायचे. म्हणजेच तुम्ही Google pay / Phone pay या द्वारे व्यवसायाचा व्यवहार करत असाल तर प्रत्येक १०० Transaction च्या मागे तुम्हाला १ रुपये दिला जाईल . हे सर्व save करून Next वर क्लिक करायचे
- Scheme Benefits Information – skill training / Tool kit / marketing support याची माहिती दिलेली आहे. Save करून Next वर क्लिक करायचे
- Declaration Details – या मध्ये फॉर्म बद्दल माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून Agree या वर टिक करून Submit वर क्लिक करायचे आहे
हे सर्व व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट केल्या नंतर तुम्हाला तुमचा Application Number येईल त्याचा फोटो काढून Done करायचे आहे . त्यानंतर तुम्हाला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरलेला फॉर्म Dawnload करता येईल.
Pm Vishwakarma yojana status
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे status पाहण्यासाठी तुम्हाला त्यांच्या https://pmvishwakarma.gov.in या वेब साईटला जावून Login वर क्लिक करायचे व Applicant Beneficial login करून तुमचा आधारकार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर टाकून .मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस पाहता येईल.
pm Vishwakarma yojana last date
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०२३ ला चालू केलेली आहे. या योजनेची फॉर्म भरायची लास्ट तारीख २०२८ पर्यंत आहे तरी तुम्ही https://pmvishwakarma.gov.in या त्यांच्या वेबसाईट ला भेट देऊन पाहू शकता.