नमस्कार शेतकरी बंधुंनो,
mashroom farming / मशरूम शेती
Mashroom farming/ मशरूम शेती ही माती विना शेती आहे. मशरूम शेती हा व्यवसाय शेतीसाठी पूरक असा व्यवसाय आहे . मशरूम ची चव प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळते . मशरूम ची ढाबा पासून ते ५ स्टार हॉटेल पर्यंत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.मशरूम हे पौष्टिक व औषधी आहे. मशरूम शेती कशी करायची या विषयी आपण पुढील प्रमाणे पाहणार आहे.
- मशरूम म्हणजे काय ?
- मशरूम चे फायदे ?
- मशरूम लागवड कशी करायची ?
- मशरूम लागवडी साठी खर्च किती येतो ?
What is a mushroom / मशरूम म्हणजे काय
मशरूम ला आळिंबी सुध्दा संबोधले जाते.मशरूम हे कुजलेल्या पदार्थावर तयार होते. मशरूम हे बुरशी पासून तयार होणारी एक चविष्ट अशी भाजी आहे . जी भाजी प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळते. त्याची मागणी धाब्यापासून ते ५ स्टार हॉटेल पर्यंत आहे. मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात मानवी शरीराला लागणारी प्रथिने आहेत. मशरूम ही माती विना शेती व्यवसाय आहे. मशरूम शेती ही सूर्यप्रकाश शिवाय केली जाऊ शकते ती सेंद्रिय खतावर तयार होते म्हणजे रासायनिक खतांचा वापर केला जात नाही .मोकळ्या जागेवर मशरूम व्यवसाय करू शकतो.
Benefits of mushrooms / मशरूम चे फायदे
- मशरूम हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले असते.
- मशरूम रासायनि युक्त तयार केलेले असते.
- मशरूमच्या सेवनाने मानवी शरीरास लागणारे पौष्टिक असे प्रथिने मिळतात.
- मशरूम शेती कमी जागेत केली जाते.
- मशरूम शेती कमी खर्चात केली जाऊ शकते मशरूम शेतीसाठी मातीची आवश्यकता नसते.
- मशरूम शेती ही कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणार व्यवसाय आहे.
- मशरूम शेतीसाठी कमी माणसांची गरज लागते म्हणजेच मनुष्यबळ कमी लागते.
- शेतकऱ्यांसाठी शेतीबरोबरच चांगला असा जोडधंदा आहे ज्यातून शेतकऱ्याचे चांगली उन्नती होते.
- मशरूम काडणी नंतर राहिलेल्या पालापाचोळा त्याचा उपयोग गांडूळ खतासाठी होतो
- मशरूम हा कमी ऊर्जेचा आहार आहे मशरूम हे वजन कमी करण्याचे काम सुध्दा करते.
- मशरूम मध्ये प्रथिने ,जीवनसत्व व तंतुमय पदार्थ असतात.
- मशरूमचा आहार हा लड्ड व्यक्तींकरता उत्तम आहे.
- मशरूम मध्ये क जीवनसत्व असतात.मधुमेह असलेल्यांना उपयुक्त ठरते .
- मशरूम हे लहान मुलांना आवश्यक मूलद्रव्ये पुरवते तसेच कर्करोग, हृदयरोग, अर्धांगवायु ,मधुमेह ,कर्करोग,हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी वरदान ठरते
- मशरूम चे नियमित सेवन केल्यास शरीराला होणाऱ्या रोगांपासून बचाव होऊ शकतो. पचनक्रिया सुरळीत चालते.
मशरूम लागवडी साठी साहित्य
पेंडा, प्लॅस्टिक शीट लाकडी साच्या हॅण्ड ,चोपर ,ड्रम, दोरी ,दोन्ही पिशव्या स्पेअर इत्यादी
How to Plant Mushroom / मशरूम लागवड कशी करायची
मशरूम बुरशी पिकवण्याचा व्यवसाय आहे आजकाल मशरूम लोकप्रिय होत चालला आहे . मशरूम लागवडीसाठी अभ्यास व अनुभव असणे आवश्यक आहे त्यासाठी त्याची माहिती कृषी विभागात त्या ठिकाणी भेट देऊन किंवा ज्याचा मशरूम फॉर्म आहे तेथे भेट देऊन त्याची माहिती घेऊ शकतो .मशरूम लागवडीसाठी घर . रिकामे घर .पोल्ट्री. बंदिस्त घर याची आवश्यकता असते. शेतकरी शेतातील पीक काढल्यानंतर जो पालापाचोळा राहतो तो जाळून टाकतो तो जाळून न टाकता त्याचा मशरूम लागवडीसाठी उपयोग केला जातो. जसे की गव्हाचा भुसा मका बाजरी ज्वारी अशा कोणत्या पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या भुसा लागतो .मशरूम मध्ये भरपूर प्रकार आहेत त्यामध्ये बटण मशरूम , धिंग्री ( ऑयस्टर) मशरूम , भातपेंडा मशरूम असे भरपूर प्रकार आहेत
सर्वप्रथम मशरूम लागवडीसाठी जागेची निवड करणे आवश्यक आहे.शेतामधील जो गहू मका ज्वारी बाजरी काढल्यानंतर जे शिल्लक राहिलेला पाला पाचोळा असतो . तो निर्जंतुकीकरण करून घ्यावा लागतो. म्हणजेच जो काही पालापाचोळा किंवा भुसा असेल त्याला 14 तास भिजवणे व नंतर त्या पालापाचोळा किंवा भुसा आहे त्याला भिजवल्यानंतर मग कोवळ्या उन्हात सुकवणे त्यामुळे त्याची आद्रता कमी होते .६०% ते ६५% आद्रता त्यामध्ये असावी लागते यालाच सबस्ट्रेट म्हणतात . हा भुसा ४ ते ५ तास सुकवला जातो त्यांनतर लागवडी साठी निर्जंतुकीकरण खोलीत नेला जातो लागवड करताना बेड भरताना १७ बाय २३ बाय पिशवीत लेअर पद्धतीने भरला जातो तो भरताना पिशवीत २” भुसा नंतर २” मशरूम बियाणे परत २” भुसा नंतर २” मशरूम असे लेअर पद्धतीने पिशवीत भरला जातो . बॅग भरल्या नंतर त्याला दोरीच्या सहाय्याने बांधले जाते नंतर त्या बॅगला ५० ते ६० होल चारही बाजूने टाचणी च्या साह्याने पाडले जातात कारण त्यामध्ये हवा जावून आतमध्ये बुरशी लागण्यासाठी होल पाडले जातात. त्यानंतर ती बॅग बंदिस्त खोली मध्ये १५ ते १८ दिवस ठेवली जाते साधारणतः बुरशी लागण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागतो दोन दिवसानंतर थोडा थोडा स्पॉट चार आणे , अटाने , एक रुपया एवढ्या प्रमाणात बुरशी वाढत राहते . १५ दिवसात बॅग पूर्णपणे व्हाइट होते पूर्ण पिशवी व्हाइट झाल्यानंतर ती पिशवी काढली जाते व ती बॅग जिथे हवा खेळती आहे त्या घरामध्ये किंव्हा शेड मध्ये बॅग दोरीच्या साह्याने वरती बांधली जाते .पिशवी काढल्यानंतर चार दिवसात मशरूम येण्यास सुरुवात होते बॅग ची पिशवी काडल्यानंतर त्यावर पाणी मारावे कारण त्याच्या बाजूने थंडावा लागतो किंव्हा पोटी ओली करून लावली जातात . ८ दिवसा नंतर पहिल्या थरावरील मशरूम भाजी करण्यास योग्य होते पण लक्षात ठेवा बॅग काढल्यानंतर त्या बॅगला दिवसातून एकदा दोनदा पाणी देणे आवश्यक आहे . मशरूमची मागणी बाजारात भरपूर प्रमाणात आहे एका बॅगमध्ये चार मशरूम च्या तोडण्या केल्या जातात नंतर नवीन बॅग तयार केली जातात .
मशरूम लागवडी साठी खर्च किती येतो ?
मशरूम लागवडीसाठी कमी प्रमाणात खर्च येतो मशरूम लागवड साठी शेतातील राहिलेला पालापाचोळा किंवा भुसा यापासून आपण मशरूम लागवड करत असतो . मशरूम लागवड आपण आपल्या घरात किंवा शेडमध्ये करत असतो. मशरूम लागवडीसाठी सरकार आपल्याला अनुदान सुद्धा देते .