silai machine Yojana|शिलाई मशीन योजना

silai machine yojana / शिलाई मशीन योजना भारतातील सर्व राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मिळणार मोफत शिलाई मशिन व आटा चक्की

Silai machine Yojana

ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सरकारने शिलाई मशीन योजना चालू केली आहे त्यामध्ये महिलांना शिलाई मशीन किंव्हा पिठाची चक्की यावर अनुदान मिळणार आहे . ज्याद्वारे महिलांना त्यांचा व्यवसायाला चालना मिळेल .ही योजना जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद म्हणजेच पंचायत समिती मार्फत राबवला जात आहे.

free silai machin yojana / फ्री शिलाई मशीन योजना

राज्य सरकार ने जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद सेस २०२३-२०२४ अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांचे कडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयात सादर करणेबाबत अर्ज मागवले आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची गिरण किंव्हा पिको व फॉल मशीन पुरवण्यात येणार आहेत

जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज त्यामधून ज्या महिला या योजने साठी लाभार्थी ठरल्या आहेत त्यांना शिलाई मशीन किंव्हा पिठाची गिरण घ्यायची आहे त्याच्या १०% रक्कम भरावी लागेल व उरलेली ९०% रक्कम सबसिडी महिलेच्या बँक खात्यात सरकार जमा करणार आहे.

Silai machine Yojana form / शिलाई मशीन चा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करायचा –

राज्य सरकारने चालू केलेल्या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा महिला व बालकल्याण विभागा मध्ये म्हणजेच पंचायत समिती येथे महिला बालकल्याण विभागा मध्ये अर्ज घेऊन त्यामध्ये अर्ज दाराचे नाव,लग्नापूर्वीचे नाव,वडील/पतीचे नाव,मोबाईल नंबर,राहण्याचे ठिकाण ,मुक्काम,पोस्ट, ग्रामपंचायत,पंचायत समिती ,जिल्हा, जन्म तारीख ,वय पूर्ण वर्ष,आधार कार्ड नंबर,अर्जदार अपंग/शेतकरी आत्महत्या ग्रस्त /विधवा/ दारिद्र्य रेषा खालील असल्याचे नमूद करून,बँकेचे नाव/ बँकेचा IFSC नंबर /बँकेचा Account number ,ग्रामसेवक दाखला ,तुमची सही,विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रमाणपत्र असेल त्यावर सही, गट विकास अधिकारी सही हे सर्व व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्र जोडून व्यवस्थित असल्याची खात्री करून तेथे जमा करायचा आहे .

Silai machine yojana document/ शिलाई मशिन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्र

शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरताना जिल्हा महिला व बालकल्याण विभाग येथे महिला बालकल्याण विभागामध्ये अर्ज जमा करताना आवश्यक कागदपत्र जमा करावी लागतात . अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्र जमा केली नाहीत तर योजनेचा लाभ महिलेला मिळणार नाही.त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे आहेत.

  • तहसीलदार प्रमाणपत्र – अर्जदार यांचे कुटुंब उत्पन्न १२०००० चे आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र सन २०२२-२०२३ या वर्षाचे जे मार्च २०२४ पर्यंत वैद्य असलेले जोडावे .
  • अर्ज दाराचा उत्पन्नाचा दाखला / प्रमाणपत्र
  • अर्जदार आधार कार्ड झेरॉक्स
  • अर्जदार मोबाईल नंबर
  • अर्जदार बँकेचे नाव
  • अर्जदाराचे बँक खाते नंबर व बँक IFSC नंबर नमूद असलेल्या पानाची झेरॉक्स
  • ग्रामसेवक दाखला
  • अर्जदार फोटो
  • अर्जदार अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार विधवा असेल तर त्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • अर्जदार वयाचा दाखला झेरॉक्स
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • इलेक्ट्रिक बिल झेरॉक्स

Silai machine Yojana Terms and Conditions / शिलाई मशीन अटी व शर्ती

  • अर्जदार हा ग्रामीण भागातील असावा.
  • अर्जदार यांचा कुटुंबातील उत्पन्न १२००००/- चे आत असावे.त्यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र सन २०२२-२०२३ या वर्षाचे जे मार्च २०२४पर्यंत वैद्य असेल ते जोडावे
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला/प्रमाणपत्र असले नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल
  • अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र असावे
  • अर्जदाराने या पूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदेच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील ५ वर्षात लाभ घेतलेला नसावा .पूर्वी योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्यास त्या बाबतची वसुली सबंधित लाभार्थी यांच्याकडून केली जाईल
  • अर्ज परिपूर्ण भरलेला असावा .अर्ज अपूर्ण भरलेला विना स्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत पत्र व्यवहार केला जाणार नाही
  • लाभार्थी ग्रामीण भागातील असावी तिचे वय १७ ते ४५ असावे .अर्ज सादर करण्याच्या दिवशी १७ पेक्षा कमी व ४५ वर्ष पेक्षा जास्त नसावे
  • मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा लाभार्थी निवडी करिता विचार केला जाईल उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थिती मध्ये विचार केला जाणार नाही.
  • निधीच्या उपलब्धते नुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे प्रत्येक प्राप्त लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही निवडीचा संपूर्ण अधिकार महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद यांनाच राहील.
  • लाभार्थी अपंग असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.अपंग असल्यास त्याच्याकडे अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे कोणी शासकीय सेवेत / निम शासकीय / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्राम पंचायत सदस्य नसावी याबाबत ग्रामसेवक दाखला अर्जा सोबत जोडावा..
  • अर्जासोबत लाभार्थी यांना कागदपत्र स्वतः साक्षांकित करून जोडावे.

mukhyamantri Majhi ladki bahin yojana पाहण्या साठी इथे क्लिक करा