नमस्कार शेतकरी बंधुंनो,
vermicompost | गांडूळ खत – गांडूळ खत निर्मिती करून शेती करा रासायनिक खत मुक्त .याच्या निर्मिती विषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गांडूळ खत निर्मिती करणे आता काळाची गरज आहे.सध्या महाराष्ट्रामध्ये रासायनिक खतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.मागील पाच वर्षे पाठीमागे रासायनीक खतांचे प्रमाण ७ हजार टन होते आता ते ७० हजार टन झाले आहे आणि ते वाढतच चालले आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला होणाऱ्या आजारापासून जसे की कॅन्सर , अटॅक इत्यादी अनेक रोगांपासून दिसत आहे . रासायनिक खतांच्या अती वापरामुळे शेत जमीन नापीक होत चालली आहे . तिच जमीन आपण गांडूळ खताच्या वापरामुळे ती जमीन सुपीक करू शकतो. गांडूळ खत निर्मिती कशी केली जाते ते पुढील प्रमाणे आपण माहिती पाहणार आहोत .
what is vermicompost / गांडूळ खत म्हणजे काय ?
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो ते खाल्या नंतर त्यांचा शरीराला लागणारा आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्टा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो यालाच गांडूळ खत किंव्हा वर्मी कंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.
गांडूळ खत निर्मितीचे उद्दिष्ट व संकल्पना
रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे . जमिनीची धूप होत चालली आहे . उत्पादनाच्या जास्त हव्यासापोटी जमिनीची पोत कमी होत चालली आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिन नापीक होत चालली आहे आपण जर शाश्वत शेतीकडे वळायचा प्रेयत्न केला तर गांडूळ खत हे शेतीचा अविभाज्य घटक आहे. आपण पूर्वी पारंपारिक शेती करायचो तेव्हा आपल्याला शेता मध्ये गांडूळ पाहायला मिळायचे परंतु सध्या त्यांचा रास होत चालला आहे . आता आपल्याला शाश्वत शेतीकडे वळाले पाहिजे . गांडूळ खताचा वापर करून शेतकऱ्याला आपली जमीनीची पोत सुधारून आपल्या पिकाची उत्पादन क्षमता वाढवून पौष्टिक अन्न तयार केले पाहिजे .
Benefits of vermicomposting / गांडूळ खताचे फायदे
- गांडूळ खत हे रासायनिक खता पेक्षा अधिक पटीने चांगले आहे.
- पीक वाढीसाठी आवश्यक घटक गांडळांच्या त्वचेमध्ये विष्ठेमध्ये सापडतात त्यामुळे मिळणारे व्हमीवॉश ( अर्क )पिकांसाठी सर्वोत्तम पीकवर्धक आहे
- गांडूळ खत हे शेणखता पेक्षा परिणामकारक खत आहे .
- या खता मध्ये वनस्पती वाढीसाठी लागणारी नत्र , पालाश , स्फुरद व अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात .
- या खतामुळे धान्यांची फुलांची फळांची टिकावू क्षमता वाढवून त्यांची रंग चव स्वाद वाढवते .
- गांडूळ खतामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते .
- गांडूळ खतामुळे शेतीमध्ये तणनाशकांचे गवताचे प्रमाण कमी होते .
- गांडूळ खत हे १००% नैसर्गिक असल्यामुळे जमिनीची पोत सुधारते व पिकांना लागणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढते .
- गांडूळ खतामुळे विषमुक्त अन्न शेतकऱ्याला मिळते व शेतकऱ्याची सुध्दा रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
vermicomposting process / गांडूळ खत प्रक्रिया
गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत ,
Land Designing / जागा कशी तयार करावी
तुम्हाला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प चालू करायचा असेल तर तुमच्याकडे जागा असणे महत्त्वाचे आहे. गांडूळ खत ही खर्चिक बाब नाही . गांडूळ खत तयार करण्यासाठी आपण जे बेड तयार करणार आहे त्यांना प्रोपर स्लोप दिला जातो . कारण आपण जे बेड वरती शेनावर पाणी देणार मारणार आहे ते पाणी त्याच्यावर पडून खालून एका साईडला कलेक्ट व्हावे यासाठी बेडच्या ठिकाणी स्लोप देणे गरजेचे आहे .
Types of Beds / बेडचे प्रकार
काही लोक पर्मनंट बेड तयार करतात बेडच्या खाली कोबा तयार करतात. दुसरी पद्धत आहे ती HDPE प्रकारची बॅग भेटते ती 12×4×2अशा प्रकारे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती हिरव्या कलरची असते . आपल्याला ४×४ असे १० फुटाच्या रुंदी मध्ये दोन बेड करून साईडला विटा लावता येतात ४ बाय ४ रुंदी लांबी ३० फूट लांब असली पाहिजेत उंची दोन ते अडीच फूट पाहिजे जेणेकरून वॉर्मिंगची मुव्हमेंट व्यवस्थित होईल . आपण जे बेडवर पाणी मारणार आहे ते व्यवस्थित मारायचे आहे कारण गांडळांना पण पाण्याची तितकीच गरज असते आपण जे पाणी मारतो ते प्रॉपर झीरपले पाहिजे मुरले पाहिजे तेथे साचून नाही राहिले पाहिजे ते नियोजन आपण व्यवस्थित केले पाहिजे .
शेण मागवताना काय काळजी घ्याल ?
आपण गांडूळ खत तयार करण्यासाठी जे शेण घेतोय ते किती दिवसाचे असले पाहिजे हे महत्त्वाचे आहे . आपण गांडूळ खतासाठी पूर्णपणे ताजे शेण असलेले वापरले नाही पाहिजे व पूर्णपणे कुजलेले शेण सुद्धा वापरले नाही पाहिजे .साधारण शेण हे 15 ते 20 दिवसानंतर चे जुने किंव्हा दोन महिन्याचे जुने शेण आपण खत निर्मितीसाठी वापरतो . गांडूळ खतासाठी आपण ताजे शेण का नाही वापरत कारण त्यामध्ये ती टॉक्सिक किंवा मिथेन वायु असतो व कुजलेल्या शेनामध्ये गांडूळांना खाण्यासाठी जे घटक लागतात ते पूर्णपणे कुजलेले असल्यामुळे भेटत नाहीत . शेण शेतकऱ्याकडून घेतल्या नंतर ते बेड वर पसरवणे त्याची हाईत 2 फूट असणे आवश्यक आहे त्याचे तापमान मेंटेन करणे महत्त्वाचे आहे जास्त थंड टेंपरेचर पण नको व जास्त गरम सुद्धा नको टेंपरेचर 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस करायचे नंतर त्यामध्ये गांडूळ टाकायचे .
Types of Earth worms / गांडुळांचे प्रकार
जमिनीत बऱ्याच प्रकारचे गांडूळ आहेत पण त्यापैकी आयसेनिया फेरिडा ही गांडूळाची जात बऱ्यापैकी वापरली जाते.कारण त्या गांडुळांची खाण्याची क्षमता जास्त असते जास्त खात असल्या कारणाने खत दाणेदार तयार होते .
Vermicompost Watering / पाणी नियोजन
शेण बेड वर टाकल्या नंतर त्या मध्ये गांडूळ सोडल्या नंतर पाणी नियोजन करणे महत्त्वाचे आहे . शेण बेड वर ओले असेल तर कमी प्रमाणात व जास्त कोरडे असेल तर पाणी जास्त प्रमाणात लागते . जास्त प्रमाणत पाणी झाले तर गांडुळांची खत तयार करण्याची प्रक्रिया बिघडून ते वरती येवून आपला जीव सोडू शकतात. त्यामुळे गरज ओळखून पाणी मारावे .
Seqregation of compost / खत काढणी
गांडूळं पासून तयार झालेले खत कसे बाजूला करायचे हे पाहणे महत्त्वाचे आहे . गांडूळ सोडल्या नंतर 20 दिवसा नंतर जो एक फुटाचा वरचा थर आहे तो प्रोपर झालेला असतो तो पूर्णपणे साईट ला काढून घेणे तो घमेल्याच्या साह्याने घेवून चाळणीने चाळून तो विक्रीसाठी काडला जातो ओपन शेड असल्यावर 15 ते 20 दिवसात खत मिळते पहिला लेयर काढल्यावर खालचा थर परत 15 ते 20 दिवसात तयार होतो. एका बेड पासून एक टन खताची निर्मिती होऊ शकते एका बेड वर खत निर्मिती साठी 1500 किलो शेण लागते.
Packaging
गांडूळ खत काढल्यानंतर ते व्यवस्थित पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे . तुम्हाला कमी भांडवलात कसे खत पॅक करता येईल याकडे लक्ष द्या .तुम्ही सुरुवातीला कोंबडी खाद्य बॅग असतात त्याचा सुद्धा वापर करू शकता पॅकेजिंग करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांपर्यंत माल पोहोचवता त्या वेळी त्यामध्ये 30 ते 40 टक्के आद्रता पातळी राखली पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये खतामध्ये अंडी किंव्हा गांडुळांची पिल्ले गेलेली असतील तर त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून शेतीला फायदेशीर ठरतील .
Segregation of Earthworms / गांडूळ विक्रीसाठी कसे तयार कराल
गांडूळ खत तयार करताना खता बरोबर गांडूळ विक्री सुद्धा केली जाते . जेव्हा तुम्हाला गांडूळ विक्री करायची असते तेव्हा जे खतासाठी बेड तयार केलेले असतात त्या बेडच्या सर्वात खाली तुम्ही हात घालाल तर खालच्या लेव्हल ला पूर्णपणे गांडूळ तयार झालेली असतात ते गांडूळ बाहेर काढून पेपर वर ठेवून किंवा ताडपत्री वर ठेवून त्याला थोडंसं ऊन किंवा प्रकाश पडला तर गांडूळ पूर्णपणे खाली जातात व ते वरचे खत बाजूला करून खालची गांडूळ पॅकेजिंग करून पाठवू शकता . पॅकेजिंगच्या बॅग बाजारात आलेले आहेत त्यामध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन राहते त्या बॅगमध्ये जर गांडूळ टाकली तर ती पॅक करून पुढे व्यवस्थित शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात . गांडूळ देत असताना त्यामध्ये थोडे खत मिक्स करून द्या जेणेकरून दिलेले गांडूळ मरण पावणार नाहीत शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतील ताजे शेण देऊ नका कारण त्याने गांडूळ मरण पावतील.